राजकीयविदर्भ

मंगरुळपीर पंचायत समिती आरक्षण सोडत सभा १३ ऑक्टोबरला

अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्ग प्रवर्गांसाठी जागांचे आरक्षण ठरणार

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार पंचायत समित्यांमधील जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर पंचायत समिती क्षेत्रासाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत पद्धतीने विशेष सभा घेण्यात येणार आहे. ही सभा येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मंगरुळपीर येथील जुनी पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे.

या सभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच त्या प्रवर्गांतील स्त्रिया आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव जागांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

पंचायत समिती क्षेत्रातील संबंधित जनतेने या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार रवी राठोड यांनी केले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही