मनोरंजनमहाराष्ट्र राज्य

मकर सक्रांत सण तिळगूळ ऐवजी साखर देवून साजरा ; सुमारे 200 क्विंटलपेक्षा जास्त साखर वाटप

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | खटाव येथे मकर संक्रांतीचा उत्साह गावचे ग्रामदैवत श्री. सोमेश्वर व आमोघसिद्ध या दोन्ही देवांना साखर वाढवून नागरिक ऐकमेकांना साखर व तिळगूळ देऊन गोड गोड बोला अश्या शुभेच्छा देत वेगळ्या पद्धतीने मोठया उत्साहात नयनरम्य आतषबाजीत हा सण साजरा करण्यात आला. गावातील सर्व नागरिकांकडून दोन्ही देवाला साखर वाढवून ऐकमेकाना साखर वाटप केले. 200 क्विंटल पेक्षा जास्त साखर वाटप करण्यात आले .

प्रत्येक वर्षी मकर संक्रात सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा मकरसंक्रात हा सण तीन दिवस साजरा करण्यात आला. दि. 13 रोजी भोगी या दिवशी बाजरीची भाकरी व विविध प्रकारच्या भाज्या तयार करून देवीला नैवेद्य दाखविला . दि.14 रोजी संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करून देवाला व देवीला नैवेद्य दाखविला जातो. याच दिवशी खटाव गावातील श्री. सोमेश्वर व अमोगसिद्ध देवाची पालखी कृष्णा नदीमध्ये स्नान करण्यासाठी व कर्नाटकातील ऐनापुर येथील श्री सिद्धेश्वर देवाची भेट घेण्यासाठी खटावपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐनापुर या गावाकडे पालखी जाते.

श्री. सिद्धेश्वर देवाची तसेच वेगवेगळ्या 11 देवाची भेट घेऊन कृष्णा नदीवर जातात . कृष्णा नदीवर दोन्ही देव स्नान करून पुन्हा रात्री खटाव गावातील श्री. सोमेश्वर मंदिराकडे येतात. त्यानंतर क्रिकांत या दिवशी सोमेश्वर व अमोघ सिद्ध या दोन्ही देवाची पालखी संध्याकाळी सोमेश्वर मंदिरातून गावातील सोमेश्वर मंदिरापर्यंत भव्य-दिव्य आतष बाजीत व पारंपारिक ढोल वाद्यात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोमेश्वर मंदिरामध्ये अनेक भक्तजन दोन्ही देवाला साखर वाढवून एकमेकांना साखर, पेढे, तिळगुळ देऊन गोड गोड बोला असे सांगत शुभेच्छा देतात. दोन्ही देवाची पालखी पारंपारिक वाजत गाजत व फटक्याच्या भव्य आतषबाजीत गावातील श्री सोमेश्वर स्टेज कट्याजवळ आणले जाते. गावात सुद्धा मोठ्या संख्येने अनेक भक्तजन दोन्ही साखरेचा नैवैद्य दाखवून एकमेकांना साखर देऊन गोड गोड बोला असे सांगत शुभेच्छा देतात.

अशाप्रकारे गावातील सर्व भक्तांकडून 200 पेक्षा जास्त क्विंटलची साखर वाटप करण्यात आला. यावेळी प्रथमच गावामध्ये कुडचे दुकानापासून स्टेज कट्ट्यापर्यंत दोन्ही बाजूला लायटिंगमाळची व्यवस्था व सूचना देण्यासाठी स्पीकरची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही