माजी खासदार संजय पाटील यांच्या PA ला मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे स्वीय्य सहायक खंडू होवाळे यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला, बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाणीप्रकरणी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कवठेमंकाळ मध्ये तुच सगळ्या बातम्या पुरवतोस, अशी म्हणत अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली असंही फिर्याद खंडू होवाळे यांनी पोलिसात दिली. या फिर्यादीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला, बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अय्याज मुल्ला, बाळासाहेब पाटील आणि पिंटू कोळेकर यांनी माझ्या दलित समाजातील स्वीय्य सहायक खंडू होवाळे याला अगोदर मारलं. मी जाब विचारला गेल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली गावा – गावात वाद निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही भंपक माणसं याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे.