माजी नगरसेवक आणि काॅग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे यांचा सुरेश खाडे यांना पाठिंबा? : संजय मेंढे यांच मौन का?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
आज मिरजेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक यांनी आपला उघडपणे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये काॅग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे देखील नगरसेवक आहेत. त्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला असून यामध्ये काॅग्रेसचे माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष संजय मेंढे आणि त्या पत्नीनी देखील उपस्थिती लावली होती.
पालकमंत्री खाडे यांनी प्रभागात कोट्यावधीचा निधी दिला आहे. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला का? हा प्रश्न पडत आहे. पण जर या ठिकाणी काॅग्रेसचा उमेदवार जाहीर केला तर नेमका प्रचार कोणाचा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर जनता जनार्दन ठरवेल असेही ते म्हणाले. पण यावर संजय मेंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला असता त्यावर टाळाटाळ केली आहे. तर -जर काॅग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला तर त्यावेळी बघू असे, त्यावर त्यांनी मत व्यक्त करत मौन धारण केले असल्याने आता प्रश्न चिन्ह उभा राहत आहे.