मिरजेत काँग्रेसकडून कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम ? एकनिष्ठ असलेल्या सांगलीकरांचा की उमेदवारीसाठी पक्षप्रवेश करणाऱ्या वनखंडे सरांचा..?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. २०१९ ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता पण २०२४ मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान की भाजपमधून नुकतेच उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळणार आणि कोणाचा नेमका करेक्ट कार्यक्रम होणार, हे पहावं लागणार आहे.
मिरजेत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण मिरजेचे लक्ष लागून राहिले आहे. मिरज मतदार संघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात पालकमंत्र्यांना आव्हान देण्यासारखा उमेदवार हवा आहे. त्यामुळे काँग्रेस कडून या मतदारसंघात जोरदार हालचालींना वेग आला आहे. पण आता काँग्रेस कडून नेमका कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार हे पहावं लागणार आहे. कारण काँग्रेसची एकनिष्ठ असणारे सीआर सांगलीकर यांनी 2014 नंतर 2019 मध्ये वरिष्ठांनी थांबण्यास सांगितले असल्याने त्यांनी विधानसभा लढवली नाही.
पण 2024 मध्ये देखील वरिष्ठ त्यांच्या नावाचा विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत असलेले उद्योजक सीआर सांगलीकर यांचा करेक्ट कार्यक्रम होणार की भाजपामध्ये गेले 18 वर्षे राहिलेले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहाय्यक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसचा हात धरलेल्या मोहन वानखंडे सर यांचा हे पहावं लागणार आहे. पण नेमका करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार आणि काँग्रेस कोणाचा करणार एकनिष्ठ असलेल्या सीआर सांगलीकरांचा की उमेदवारीसाठी आलेल्या मोहन वनखंडे सरांचा हे येत्या काळात स्पष्ट होईल.