मिरजेत टोळी युध्दाचा वाद विकोपाला : एकाचा खून, एकजण जखमी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज शहरातील कमान वेस येथे सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. कुणाल दिनकर वाली असे त्याचे नाव आहे. तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत माहिती अशी की, मिरजेत गेल्या काही दिवसापासून दोन गॅंगमध्ये राडा सुरू होता. यातून एकमेकांवर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला होता. कुणाल वाली आणि त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे रविवारी रात्री कमानवेस मधून निघाले होते. यावेळी हल्लेखोर त्या ठिकाणी आला. त्याने दोघांना अडविले. यावेळी दोघात वाद झाला. यातून संशयित हल्लेखोराने कुणाल वाली आणि वंश वाली या दोघांच्या वर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये कुणाल वाली जागीच ठार झाला. तर वंश वाली गंभीर जखमी झाला आहे. वंश वाली याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मिरज शहरात गेल्या काही दिवसापासून दोन कोयता गॅंगमध्ये टोळी युद्ध सुरू होते. हाच वाद विकोपाला गेल्याने कुणाल वाली याचा खून केला असल्याची चर्चा सुरू होती.