महाराष्ट्र राज्य

मिरजेत डॉ. रियाज उमर मुजावर यानी काळासह वेळेलाही दिला चकवा..! (सुपरफास्ट एंजियोप्लास्टी)

हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर ६ मिनिटात केली अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

मिरज | एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो.. तो अवघ्या काही मिनिटात होत्याचे नव्हते होते.. काही वेळांपूर्वीच आपणासोबत बसलेला, बोललेला, भेटलेला व्यक्ती काही मिनिटानंतर आपल्यात, या जगात नसतो… वेळेला कोणीही थांबू शकत नाही..! असे म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो. मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसते. मात्र हृदयाच्या धमनीत ९९ टक्के ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णावर अवघ्या ६ मिनिटांच्या ‘गोल्डन अवर’ मध्ये अँजिओग्राफी सह अँजिओप्लास्टीची प्रक्रियाही पूर्ण करत रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे. देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. रियाज उमर मुजावर यांची कुशलता, कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. अँजिओग्राफीच्या पहिल्या शूट नंतर अवघ्या सहा मिनिटात अँजिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटांनी रुग्णाचा काढलेला ईसीजी नॉर्मल आला आहे. मिरजेतील डॉ. रियाज उमर मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला.. असेच म्हणावे लागेल अशी ही घटना आहे.

ही घटना आहे मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजीची. डॉ. रियाज उमर मुजावर त्यांच्या ओपीडी मध्ये नियमित रुग्ण तपासणी मध्ये व्यस्त आहेत. दुपारचा १ वाजून १ मिनिट झाला आहे. आणि त्यांच्या फोनची रिंग वाजली.. जयसिंगपूर मधील फिजिशियन डॉ. निखिल मगदूम यांचा त्यांना फोन आला होता. जयसिंगपूर येथील ५७ वर्षीय अत्तार नामक पेशंटच्या छातीत प्रचंड जळजळ होत होती. मात्र, ईसीजी नॉर्मल आला होता. डॉ. मगदूम यांनी परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णाला मिरजेला डॉ. मुजावर यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले होते. रुग्ण आणि त्यांचे बंधू डॉ. रियाज अत्तार हे दोघे वाहनातून मिरजेकडे येण्यासाठी निघाले. मात्र, रस्त्यात रुग्णाच्या छातीमध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. डॉ. अत्तार यांचा पुन्हा डॉ. मुजावर यांना फोन आला. डॉ. मुजावर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला तातडीने भारती हॉस्पिटलला आणण्यास सांगितले आणि डॉ. मुजावरही मिरजेतून तातडीने काही मिनिटातच भारती हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

रुग्ण त्या ठिकाणी येतात डॉ. मुजावर यांनी ईसीजीद्वारे त्यांची प्राथमिक तपासणी केली. तर त्यांना तीव्र हार्ट अटॅक आल्याचे निदान झाले. रुग्णाला कॅथलॅब मध्ये नेण्यात आले. १ वाजून ३५ मिनिटांनी रियाज उमर मुजावर यांनी अँजिओग्राफीचा पहिला शूट घेतला आणि १ वाजून ३७ मिनिटांनी अँजिओग्राफीचा दुसरा शूट घेतला. रुग्णाच्या हृदयाच्या धमनीत ९९ टक्के ब्लॉक असल्याचे निदान झाले. मोठ्या प्रमाणात धमनी ब्लॉक आणि त्यातच रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता. रुग्णावर तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. रियाज उमर मुजावर यांच्या लक्षात आले. डॉ. मुजावर यांनी १ वाजून ४० मिनिटांनी प्रायमरी अँजिओप्लास्टीद्वारे हृदयाच्या धमनीतील अडथळा दूर करीत रुग्णावर यशस्वी उपचार केले. रुग्ण सामान्य स्थितीत येऊ लागल. १ वाजून ३५ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटे.. अशा केवळ ६ मिनिटांच्या कालावधीत अँजिओग्राफीसह अँजिओप्लास्टीचीही प्रक्रिया डॉ. रियाज उमर मुजावर यांनी जलद गतीने पूर्ण केली. अँजिओप्लास्टीनंतर काही मिनिटांनी पुन्हा रुग्णाचा इसीजी काढण्यात आला, तो नॉर्मल आला. आता रुग्ण पूर्णतः सामान्य स्थितीमध्ये आहे. डॉक्टरांनी दाखवलेले “कौशल्य, कार्यतत्परता, गतिमानता” यामुळे रुग्णाचे प्राण वाचले आहेत. मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही एक दुर्मिळ अशीच घटना म्हणावी लागेल.

डॉ. रियाज उमर मुजावर यांनी वैद्यकीय शास्त्रात हृदयरोग तज्ञ म्हणून सखोल ज्ञान आत्मसात केले आहे. त्यांनी अतिशय प्रतिष्ठित अशा रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा केली आहे. अतिशय तज्ञ अशा डॉक्टरांकडून त्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतले आहे. यातून हृदयविकारांवरील उपचारांमधील त्यांनी अत्त्युच्च असे कौशल्य विकसित केले आहे. त्याला जोड मिळाली आहे ती त्यांच्या सातत्यपूर्ण रुग्णसेवेची. मिरजेमध्ये विविध रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा देत असताना २४ तास डॉ. रियाज मुजावर हे सक्रिय असतात. आजपर्यंत हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. हृदय रोगांवरील उपचारांचे त्यांनी घेतलेले सखोल ज्ञान, विकसित केलेले कौशल्य आणि रुग्णसेवेतील सातत्य यांचा मिलाफ डॉ. रियाज उमर मुजावर यांच्या उपचारांमध्ये दिसून येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही