मिरजेत दोन गटात तुफान हाणामारी ; दोघेजण जखमी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरजेत शनिवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. यामध्ये हाणामारीत संबंध नसलेल्या दोघांना याची जबर किंमत मोजावी लागली आहे. दोघांना या हाणामारीत जबर दुखापत झाली आहे. दोघांना ही उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
मिरज शहरात वर्चस्वावरून मिरजेतील अग्निशमन दलाच्या जुन्या कार्यालयासमोर हे दोन गट भिडले, त्यावेळी तेथेच एका मंडळाचा संकष्टी निमित्त महाप्रसाद सुरू होता तर महाप्रसादासाठी आलेले दोघेजण त्याठिकाणी गेले असता, त्यांना ही हाणामारीत दुखापत झाली तर मिरजेतील खाजा वसाहत येथे एका मोटारसायकली चेही नुकसान करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर शहरात राडा करणाऱ्या टोळीची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे तर याबाबत रविवारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते