मिरजेत भर दिवसा चेन स्नॅचिंग ; दीड तोळ्याचे दागिने केले लंपास ; चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरजेतील ब्राह्मणपुरी येथे सकाळच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. अंबाबाई मंदिराच्या समोरील गजबजलेल्या ब्राम्हणपुरी ठिकाणी भर दिवसा चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, दुचाकीवरून हिसडा मारून सुसाट पसार झालेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्हीच्या कॅमेरात त्याची छबी कैद झाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती अशी को, शहरातील रघूकुल निवास ते अंबाबाई मंदिराच्या समोरील चौका दरम्यान ब्राम्हणपुरी येथे सकाळच्या सुमारास घटना घडली. आंबाबाई मंदिराच्या समोर दुचाकीवरून भरधाव आलेल्या दुचाकी स्वाराने दुचाकीवरून मुलांना शाळेत सोडून घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसाकवले. दुचाकीवरून चोरटा भरधाव असतानाच त्याने चोरी केल्याने महिलेच्या गळ्यातील दागिने त्याने हिसकावून नेली. हिसका बसल्याने महिला ओरडली मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यातील काहींनी त्याचा पाठलाग केला. मात्र, चोरटा भरधाव गेल्याने तो कुठे गेला, तेच समजू शकले नाही. त्या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते.
या घटनेनंतर आरडाओरडा झाल्याने नागरिकही जमले. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. पोलिसही त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठिकाणाची पाहणी केली मात्र, अपेक्षीत यश आले नाही. मात्र, त्या परिसरात बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात तो चोरटा मात्र भरधाव जाताना कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित दूचाकीवरून जाताना दिसते आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गजबजलेल्या ब्राम्हणपुरी सारख्या ठिकाणी भर दिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत असून घटनेची नोद करण्याची प्रक्रिया सुरू होती.