वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा बंद पाडण्याचा विघ्नसंतोषींचा प्रयत्न ; याप्रसंगी अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करु ; नानासाहेब वाघामारेंचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटलची हडप करण्याचा होत असलेला आरोप चुकीचा आहे. सुरू झालेले हॉस्पिटल पुन्हा बंद पाडण्याचा डाव काही विघ्नसंतोषींचा प्रयत्न आहे. मात्र, हे हाॅस्पीटल सर्वसामान्यांसाठी सुरु होईल. प्रसंगी हॉस्पिटल सुरु होवू नये, यासाठी चुकीच्या पध्दतीने अफवा पसरविण्याचाही प्रयत्न सुरु आहे. अश्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा ‘रिपाइं’ आठवले पक्षाचे नानासाहेब वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी वॉन्लेस हॉस्पिटलच्या संचालक डॉ. प्रभा कुरेशी, कामगार संघटनेचे सतीश वायदंडे, राजू लोंढे उपस्थित होते.
नानासाहेब वाघमारे म्हणाले, खासगी संस्थेतर्फे वॉन्लेस हॉस्पिटल सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही काही जणांनी चुकीची माहिती दिली. काही विघ्नसंतोषी मंडळीकडून हॉस्पिटलबाबत अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटल हे १ मे पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू असून, टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू होणार आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम होऊ नये, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे खोट्या तक्रारी करण्यात आल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.
कोणताही संबंध नसणारे रुग्णालयाची ४७ एकर जागा बळकवण्याचा आरोप करीत आहेत. कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने रुग्णालयास आदेश दिला नाही. तसेच कामगारांच्या वेतनाची थकीत ४३ कोटी रक्कम टप्प्याटप्प्याने देऊ असे डॉ. प्रभा कुरेशी यांनी सांगितल आहे.