मिरज | गोवा बनावटीची दारू जप्त ; एकास अटक ; सांगली एलसीबीची कारवाई

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरजेजवळील सुभाषनगर येथे “गोवामेड” बनावटीच्या दारूची राजरोसपणे अवैधरित्या विक्री करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश यशवंत खोत (वय ५२, रा. शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राजरोसपणे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना सुभाषनगर येथील प्रकाश खोत घराजवळच दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी खोत एक पोते घेऊन बसल्याचे दिसून आले.
पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. त्याच्याकडून साठा केलेल्या दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, बाबासाहेब माने, सोमनाथ पतंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.