मिरज तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख मा.महेंद्र (भाऊ) चंडाळे, बांधकाम कामगार सेना जिल्हाअध्यक्ष मा.शरद यमगर, ओबीसी जिल्हाध्यक्ष मा. विक्रम चव्हाण, उपाध्यक्ष मा. श्रीकांत यमगर, राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष मा. अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व बांधकाम कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या आदेशाने मिरज तालुक्यात शिवसेना संघटन वाढविण्यासाठी वंचित शोषित घटकांना विविध सामाजिक उपक्रमातून पक्षांचा विचार, प्रसार संघटनेच्या माध्यमातून करणार या हेतूने बांधकाम कामगार संघटनेच्या मिरज तालुका प्रमुखपदी परशुराम बनसोडे, तालुका संघटक पदी गणेश मोहिते, तालुका उप संघटकपदी विजय मोहिते, मिरज तालुका सह संघटकपदी हणमंत कांबळे तसेच पलूस तालुका प्रमुखपदी रावसाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सांगली बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष शरद यमगर यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा. महेंद्र (भाऊ) चंडाळे यांच्याकडून निवडीचे पत्र देऊन संघटना वाढविण्यासाठी काम करणेस शुभेच्छा देण्यात आल्या.