मिरज मतदार संघात वयोश्री योजना यशस्वी करणार – राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे ; प्रशासनाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | तालुक्यातील ढवळी येथे आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे शिबिराचे उद्घाटन मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (दादा) दबडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहॆब ओमासे उत्कर्ष खाडे उपसरपंच सचिन काबंळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेली ही योजना उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव दबडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राबविली आहे. या शिबीरास वृध्दांचा प्रतिसाद मिळत आहे.
मुख्यमंत्री वयोश्री शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे व ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठीचे लागणारे अर्ज भरून घेऊन त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती शिबिरामध्ये देण्यात आली. या शिबिरासाठी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर डॉक्टर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांच्या अर्ज भरून घेत आहेत. ढवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी आव्हान केले आहे.
मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांना लागणारे श्रवण यंत्र कमोड चष्मा हे साहित्य मिळणार आहे. दबडे यांनी स्वबळावर कार्यकर्त्यांना सोबत घेवून ६४ गावात या योजनेचा वयोवृध्दांना लाभ मिळवून देण्यासाठी झंझावत सुरु केला आहे, याला मोठा प्रतिसाद. मिळत आहे. या योजनेचा लाभ ढवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आव्हान मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवकचे उत्कर्ष खाडे बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे, भाऊसो नरगच्चे, ढवळीचे सरपंच आकाश गौवराजे, माजी उपसरपंच स्वप्निल बनसोडे, राष्ट्रवादीचे युवा नेते हर्षल सावंत बोलवाडचे माजी उपसरपंच अजित कांबळे, रियाज शेख, परशुराम बनसोडे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका तसेच डॉक्टर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.