महाराष्ट्र राज्य
मिरज शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाईन लिकेज ; पाणी पुरवठा होणार अपुरा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज/कुपवाड प्रतिनिधी ; राजू कदम
मिरज महापालिकेची मिरज- म्हैसाळ रोडवर असलेली मिरज शहरास पाणीपुरवठा करणारे मुख्य पाण्याची लाईन आज लिकेज झाली आहे. मिरज महापालिकेने तातडीने पंपिंग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लिकेजचे काम उशिरापर्यंत चालणार असल्याने आज आणि उद्या मिरज शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. मिरज शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद करणे यांनी केले आहे.