LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | भारतीय जनता पार्टी व आमदार सुरेशभाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीने, युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या पुढाकाराने भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार, दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर हा जल्लोष रंगणार आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा संगम अनुभवायला मिळणार आहे. विशेष आकर्षण म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग, तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांची उपस्थिती रंगत वाढवणार आहे.
याशिवाय महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंद पथक, मुंबई हे विशेष आकर्षण ठरणार आहे. सोहळ्यास पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या दहीहंडीची किंमत तब्बल 1 लाख 55 हजार 555 रुपये ठेवण्यात आली असून यंदा गोविंद पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
माजी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व मिरजकरांना आवाहन केले आहे की, या भव्य दहीहंडी सोहळ्यास उपस्थित राहून पारंपरिक उत्सवाचा आनंद घ्यावा व दहीहंडीच्या थराराचा साक्षीदार व्हावे.