मिशन हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी अंधारात : शिवसेनेचे तालुका संघटक आक्रमक ; लाईट न आल्यास आंदोलनाचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज येथील मिशन हॉस्पिटलमधील नर्सिंग कॉलेजचा विद्युत पुरवठा गेल्या चार ते पाच दिवसांपासून खंडित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या दिव्याखाली आपले जीवन चालवावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लाईट कनेक्शन बंद असल्याने नर्सिंग व फिजिओथेरपीच्या मुला मुलींना धोका निर्माण झाला आहे.
मिरजेतील मिशन हॉस्पिटल येथे नर्सिंग कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये दुर्गम भागातील व गरीब विद्यार्थ्यांनी दोन ते अडीच लाख रुपये भरून ऍडमिशन घेतात. घरापासून दूर राहून चांगले शिक्षण घेऊन काही तरी मोठे बनण्याच्या अपेक्षेने विद्यार्थी येथे आले आहेत. मात्र, येथे त्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
या मिशन हॉस्पिटल येथील नर्सिंग कॉलेज येथे महाविद्यालय आणि हॉस्पिटल असून नर्सिंगचे 400 विद्यार्थी फिजोओथेरेपी चे 200 विद्यार्थी असे जवळपास अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरून ऍडमिशन दिले जाते तरी गेल्या चार ते पाच दिवसामध्ये कॉलेजनी वेळेवर वीज बिल न भरल्याने वीज खंडित करण्यात आली आहे. गेली चार-पाच दिवस झाले विद्यार्थी हे मेणबत्तीच्या दिव्याखाली आपले जीवन चालवत असून कॉलेज मुळे हे विद्यार्थी अंधारात आहे. लाईट कनेक्शन बंद असल्याने नर्सिंग व फिजिओथेरपीच्या मुला मुलींना धोका निर्माण झाला असून त्यामध्ये विद्यार्थी बरोबर काही बरे वाईट झाल्यास त्याला पूर्ण हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार आहे.
सदर बाबीची दखल घेऊन आज शिवसेनेचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंत लाईट येईल असे आश्वासन किरण कांबळे यांना दिले आहे. जर आज लाईट आली नाही तर किरण कांबळे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.