महाराष्ट्रसामाजिक

मुंबईत रविवारी वर्षावास व कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे

पाटण | भारतीय बौद्ध महासभा, पाटण तालुका (मुंबई) आणि बौद्ध विकास मंडळ, कोयना विभाग (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (मुंबई) येथे वर्षावास व कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी अध्यक्ष व प्रमुख आयोजक प्रदिप कदम यांनी ही माहिती दिली.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता धम्मवंदना व स्वागत समारंभाने होईल. त्यानंतर भंतेजी विशुध्द बोधी यांचे धम्म प्रवचने होणार आहेत. तसेच, कार्यक्रमात भिमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनावर आधारित भाषणही दिले जाईल.

स्नेहमेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, पाटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध धार्मिक संघटना व पक्षाचे पदाधिकारी तसेच बौद्ध विकास मंडळ, कोयना विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुख्य संयोजक प्रदिप कदम, अनिल मोहिते, चंद्रकांत बल्लाळ यांनी तालुक्यातील मुंबई व गावस्थित उपासक-उपासिका, बंधू-भगिनींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून बौद्ध धर्माचा संदेश प्रसारित करण्याचे आवाहन केले आहे.

स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून उपस्थितांना बौद्ध मूल्यांचा अनुभव मिळेल, समाजातील ऐक्य, सद्भावना व कौटुंबिक नाती घट्ट करण्यास मदत होईल, असे आयोजकांनी सांगितले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही