मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे वाजले बारा ; खैरदी कार्यकारी अभियंता आहे का? सेटलमेंट बादशाह

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्यांना अभय कोणाचे?
लातूर प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो) श्री. ए. ए. खैरदी यांनी संबंधित कंत्राटदार यांच्या संगनमतानेच निकृष्ट दर्जाचे कामे केले असून रस्त्याचे कामे हे जनतेच्या विकासासाठी आहे की गुत्तेदार पोसण्यासाठी आहे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो) श्री. ए. ए. खैरदी हे अधिकारी आहेत का सेटलमेंट बादशाह? अशी जनतेतून चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून छोट्या छोट्या गावाला जोडण्याचा शासनाचा हेतू चांगला आहे. पण संबंधित कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अतिशय निकृष्ट दर्जाचे कामे करीत असल्याने लाखो रुपये खर्चून मजबुतीकरण केलेल्या रस्त्याचे बारा वाजले. पुढे-पुढे काम चालू आणि मागे-मागे केलेला काम उखडत असल्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे बारा वाजले की काय? अशी चर्चा जनतेतून होत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लातूर तालुक्यातील आर्वी – नांदगाव – रायवाडी – साई – आरजखेडा दरम्यान, सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी संबंधित गावच्या नागरिकांनी केल्या आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदरील रस्त्यांच्या मंजूर निविदेत नमूद असलेल्या तरतुदीनुसार कंत्राटदाराकडून दर्जेदार पद्धतीने वेळेत काम करून घेण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी लक्ष घालतील, अशी अपेक्षा माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सदर पोस्ट फेसबुकवर अपलोड करून तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा केली आहे.
रामा २३८ ते देवणी तालुक्यातील हसनाळ इजीमा ६५ ते कर्नाटक राज्य सरहद्द या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. साईड शोल्डर च्या कामात काळी माती युक्त मुरूम वापरण्यात आलेला आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे प्रॉपर हार्ड मुरूम वापरलेले नाही. अंदाजपत्रकात नेमून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. GSB ची जाडी व रुंदी कमी करण्यात आली आहे. WMM जाडी कमी करण्यात आली असून ग्रेडेशन प्रमाणे करण्यात आले नाही. डांबर कामामध्ये जाडी कमी करण्यात आली आहे व त्यामध्ये डांबराचे प्रमाण कमी आहे. अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी देऊन सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.
अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आले नाही. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या शाखा अभियंत्यावर कार्यवाही करावी अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.