मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून जवान सिंदूर मोहिमेसाठी जम्मू काश्मीरला रवाना

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | भारत – पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सिध्देवाडी ( ता. मिरज) येथील जवान रुपेश उर्फ बाळू शेळके या जवानाने आपल्या तीन महिन्याच्या मुलाचा नामकरणाचा सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा अर्शिवाद घेत भारताने राबविलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाला. आपल्या घरच्या कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्व देणाऱ्या जवान रुपेश उर्फ बाळू शेळकेंच्या देशप्रेमाला सिध्देवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम करित मंडपात उपस्थित ग्रामस्थांनी भारत मातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिले.
पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दहशतवादाविरोधात सिंदूर या नावाने मोहीम उघडली आहे. भारताचे जवान भारत मातेचा नारा देत पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात तुटून पडले आहेत. सध्या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय जवान सतर्क झाले आहेत. जवानांच्या सुट्ट्या रद्द करताना रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिले आहेत. गेली १० वर्षे सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रुपेश उर्फ बाळू हे आपल्या तीन महिन्याच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक महिन्याच्या सुट्टीवर सिध्देवाडी या मुळ गावी आले होते. गुरूवारी ८ मे रोजी घरी तीन महिन्याच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता. पै-पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमत्रित केले होते. मंडप गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रमासाठी काही कालावधी बाकी असताना रुपेश उर्फ बाळू शेळकेयांना भ्रमणध्वनीवर जम्मू – काश्मिर येथे कर्तव्याचे हजर रहाणे आदेश मिळाला. आदेश मिळताच जवान शेळके यांनी कर्तव्यवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंडपात उपस्थित माता लक्ष्मीबाई शेळके, थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचे दर्शन घेत आपल्या दोनही मुले पत्नी रूपाली हीची भेट घेत हसतमुखाने देशसेवेसाठी जम्मू – काश्मीरला रवाना झाला.
“माझा भाऊ 3 महिन्याच्या स्वतःच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून देशसेवेसाठी निघून गेला., आम्हा कुटुंबीयांसाठी देशसेवा हाच मोठा कार्यक्रम आहे.माझ्या भावाच्या देशभक्तीचा मला सार्थ अभिमान आहे.
अमोल बाबासो शेळके (भाऊ)
माझे पती आमच्या बाळाच्या बारशासाठी सुट्टीवर आले होते., परंतु अचानक त्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश प्राप्त झाला. त्यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाण्याचे दु: ख झाले, मत्र देशसेवा महत्वाची आसल्याने माझ्या पतीचा निर्णयाला माझा पाठींबा आहे. स्वतःच्या बाळाच्या कार्यक्रमापेक्षा देशसेवा -देशभक्ती महत्वाची आहे.
रूपाली रूपेश शेळके (पत्नी)