मेव्हण्याकडून मारहाणीमुळे भंगार विक्रेत्याचे विषप्राशन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरजेत घर घेण्यासाठी दिलेले 21 लाख रुपये परत मागितल्याने मिरजेत तानाजी शंकर गोसावी (वय-55) मिरज या भंगार विक्रेत्यास मेव्हण्याने व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण, दमदाटी केली. यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भंगार व्यवसाय करणाऱ्या तानाजी गोसावी यांनी त्यांच्या पत्नीचा भाऊ कुमार गोसावी यास घर घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अर्जुन विठ्ठल कोळी रा शास्त्री चौक मिरज यांचेकडुन 21 लाख रुपये घेऊन कुमार यास चेक द्वारे दिले. हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन कुमार गोसावी त्याची पत्नी सुमन व मुलगा गोविंद गोसावी यांनी दि. 25 रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापुर रोडवर तानाजी गोसावी यांना ,शिवीगाळ व दमदाटी व मारहाण केल्याची तक्रार आहे.
याबाबत पोलिसात तक्रार दिल्याने कुमार याचा नातेवाईक जलाल गोसावी व उमेश गोसावी यांनी रा. बेडकीहाळ ता. चिकोडी यांनी तू कुमार गोसावी याच्याकडुन पैसे मागू नकोस, अशी फोनवरून धमकी दिली. यामुळे तानाजी गोसावी यांनी किटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले. यां घटनेनंतर कुमार गोसावी फरारी झाला. याबाबत गांधी चौक पोलिसात कुमार भरत गोसावी वय 40 सुमन कुमार गोसावी (वय-32) गोविंद कुमार गोसावी (वय-19) तिघे रा. कोल्हापुर रोड मिरज यांच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.