मिरजेत बंगला फोडून 9 तोळे सोने चोरीला गेल्याची घटना : मिरज शहर पोलीस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरजेत दत्त कॉलनी पूर्व भाग रस्ता क्र.१ येथील बंगला फोडून सुमारे नऊ तोळे सोने चोरीला गेले असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नागेश कोरे यांचा सोनाई हा बंगला काही अज्ञात चोरट्यांनी रात्री फोडून सुमारे नऊ तोळे सोने लंपास केले आहे. नागेश कोरे हे आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. सकाळी नागेश कोरे यांचा बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने येथील नागरिकांनी त्यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर नागेश कोरे हे आपल्या घरी आले आणि पाहणी केली असता, त्यांना बेड आणि कपाट येथील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर ठसे तज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मिरज शहर पोलीस ठाण्यात सूरू असून अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहे.