महाराष्ट्रसामाजिक

म्हावशीचे सुपुत्र मंगेश मोळावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; उद्योग क्षेत्रात घेतली गरूड भरारी

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

म्हावशी (ता. पाटण) | पाटण तालुक्यातील म्हावशी गावचे सुपुत्र, माजी ग्रामपंचायत सदस्य व युवा उद्योजक मंगेश मोळावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व सोहळ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाटण शहरात पार पडलेल्या या वाढदिवस सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन तसेच पर्यटन, खणीकर्म व माजी सैनिक कल्याण विकास मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.

या प्रसंगी यशराज देसाई यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच मंगेश मोळावडे यांच्या ‘एम. एस. ऑफिस’ या नव्या कार्यालयाचे उद्घाटन ही संपन्न झाले. उद्योग क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणाऱ्या मंगेश मोळावडे यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांनी केला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी *रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोजर, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती विनोद झगडे, मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे सरपंच किरण दशवंत, पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश पानसकर, शिवसेना अल्पसंख्यांक विभाग पाटण तालुका प्रमुख इरफान सातारकर, इंदोलीचे उपसरपंच निखिल संकपाळ तसेच अडूळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहुल सत्रे उपस्थित होते.

दरम्यान, मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी फोनवरून मोळावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम. एस. ग्रुपचे सदस्य अंकुश सुतार, सचिन सलते, सोनू निकम, विक्रम जाधव यांनी परिश्रम घेतले.

मंगेश मोळावडे यांनी आपल्या कार्याने उद्योग क्षेत्रात तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही