मिरज विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या पत्नीला यात्रा कमिटीकडून अपमानास्पद वागणूक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटावमध्ये यल्लमा देवी यात्रेत आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरज विधान परिषदेचे आमदार इंद्रीस नाईकवाडी यांच्या पत्नी देवीचे दर्शन घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात कमिटी सदस्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र, मान्यवरांना सन्मान देण्याची जबाबदारी असलेल्या यात्रेच्या कमिटीने त्यांच्याशी केलेली वागणूक अक्षरशः अपमानास्पद ठरली.
सदर कार्यालयात पोहोचताच त्यांना बसण्यासाठी साधी खुर्चीही देण्यात आली नाही. काही वेळ त्या उभ्याच राहिल्याचे पाहून उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली. महिलांना आणि मान्यवरांना अपेक्षित सन्मान न देणाऱ्या या वर्तनावरून कमिटीचे निष्काळजीपण स्पष्ट झाल्याची चर्चा लोकांत रंगली आहे.
बांधकाम कामगार संघटनेने या प्रकाराचा जोरदार निषेध नोंदवत कमिटीवर गंभीर आरोप केले. जिल्ह्यातील मान्यवर महिला अतिथीचा असा अपमान यात्रेत कधीही झाला नव्हता, असे म्हणत या झालेल्या कृतीबद्दल यात्रा कमिटीनें जाहीर माफी मागण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, “माफी नाही तर आंदोलन” असा थेट इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
या घटनेमुळे यात्रेचे वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत खटावमध्ये राजकीय घडामोडी आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.