युवा नेते सागर दादा आवळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
आरग येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते सागर दादा आवळे यांचा वाढदिवस आंबेडकरी समाजाचे नेते महेश कुमार कांबळे आणि नानासाहेब वाघमारे यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांनी आरग येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विधायक कार्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

सागर आवळे यांचा वाढदिवस नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतात. यंदाही समाजसेवा आणि विकासकार्यांमध्ये सदैव पुढे असलेल्या सागर आवळे यांनी वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या हस्ते पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सर्वांच्या मदतीला धावून येणारे अशी त्यांची आरग गावात ओळख आहे.

यावेळी कार्यक्रमावेळी पश्चिम महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष नानासाहेब वाघमारे, एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे, आरग बौद्ध समाजाचे नेते तसेच आरग विकास सोसायटीचे संचालक बौद्धाचार्य जयपाल धोंडीराम कांबळे, बोलवाड गावचे डेप्युटी सरपंच सचिन दादा कांबळे, आरपीआय नेते लालासाहेब वाघमारे, जनस्वराज्याचे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, आरगचे माझी डेप्युटी आदम बुवा, आरगचे नेते मोशीन मकानदार, परशुराम बनसोडे अध्यक्ष मिरज तालुका प्रहार जनशक्ती पक्ष तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.