सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यावर काकासाहेब धामणे व पालकमंत्र्यांच्या दबाव ; डॉ. महेशकुमार कांबळे यांचा आरोप

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांचेवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज दि. 14/04/24 पासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यावर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे व मालगावचे नेते काकासाहेब धामणे यांच्या दबाव तंत्रामुळे मालगावचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर कारवाई केली जात नाही असा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास सांगली जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरणार त्यामुळे प्रशासनाने आंबेडकरी समाजाचे अंत पाहू नये तात्काळ जगताप यांच्यावर निलंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीस गैरहजर राहिल्याने यांच्यावर निलंबाची कारवाई करावी याकरिता मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला सर्व पक्षीय पक्ष, संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने १०/०७/२४ व १५/०७/२४ रोजी यांच्या कारभाराची चौकशी करावी, अन्यथा पंचायत समिती समोर मोर्चा काढणार असे निवेदन दिले होते. येत्या १० दिवसात जगताप यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. आश्वासन देऊनही अद्याप कारवाई न केल्यान संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
प्रशासनाकडून एखाद्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला कारवाई टाळण्यासाठी विभागीय चौकशीचा आधार घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना चौकशीच्या माध्यमातून अभय मिळते. मालगावचे ग्रामसेवक यांच्यावरील करवाईबाबतचा प्रकारसुद्धा यापद्धतीचा असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रशासनावर राजकीय दबाव तंत्राचा वापर होत असल्याने जगताप यांच्यावरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई अपेक्षित असताना जाणीवपूर्वक वाचवले जात आहे.
ग्रामविकास अधिकारी जगताप यांचेवर विभागीय चौकशी ऐवजी ठोस कारवाई न केल्याने मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यामुळे तात्काळ येत्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी कारवाईला विलंब केल्यास सांगली जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरणार त्यामुळे प्रशासनाने आंबेडकरी समाजाचे अंत पाहू नये, तात्काळ ग्रामसेवक जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे.