राजकीय वरदहस्त असलेल्या “ठाण बंदा” ची तात्काळ बदली करा ; प्रहरची मागणी
तालुक्यातील ग्रामसेवकाची थेट मंत्रालयात तक्रार....

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज तालुक्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक यांची बदली करा, या मागणीचे निवेदन थेट मंत्रालयात देण्यात आले आहे. प्रहारचे तालुका उपाध्यक्ष परसराम बनसोडे याबाबतचे लेखी तक्रार केली आहे.
तालुक्यातील अनेक स्थानिक ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सेवेत रुजू झाल्यापासून एकाच तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. बदली केवळ एका गावातून शेजारील दुसऱ्या गावात करून घ्यायची आणि तिथेच नोकरी करायची असा प्रकार सुरू आहे. या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय वरदहस्त आहे.
राजकीय दबाव तंत्र वापरून अनेक ग्रामसेवक संघटनेच्या जोरावर एकाच तालुक्यात काम करीत आहेत. दुसऱ्याच्या नावावर शासकीय कामे घ्यायची आणि पोट ठेकेदार म्हणून काम करायचे. असा प्रकार अनेक ठिकाणी सर्रास सुरू आहे.त्यातच अनेक ग्रामसेवक स्वतः ठेकेदार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामसेवकानी ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये हडप व घोटाळा केले आहे असे निवेदनात म्हणले आहे.
त्यामुळे मिरज तालुक्यातील ग्रामसेवकांची चौकशी करून दुसऱ्या तालुक्यात बदली करावी अन्यथा मुंबई मंत्रालया येथे प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे परशुराम बनसोडे यांनी सांगितले.