येत्या ३ ॲाक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचे निळे वादळ साताऱ्यात धडकणार

LiVE NEWS | UPDATE
कोल्हापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेल्या रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे होणार आहे.
यावेळी कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, राज्य कामगार आघाडी सरचिटणीस गुणवंत नागटिळे, युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, सरचिटणीस जयशिंग पाढळीकर, शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, प्रदीप ढाले, लक्ष्मण पारसे,बाळासाहेब कांबळे,राहूल कांबळे, राजू माळगे तसेच सर्व तालूका अध्यक्षासह जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प.म. कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, प.म.सरचिटणीस जिंतेंद्र बनसोडे, राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव मंगलराव माळगे तसेच या बैठकीचे अध्यक्ष उत्तम कांबळे (दादा), जिल्हा उपाध्यक्ष दिपक भोसले व राज्याचे नेते कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर येथे पार पडली.
ना:रामदासजी आठवले साहेब यांची ताकत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी आहे. त्या अनुशंघाने कोल्हापुरहून साताऱ्यात येत्या ३ ॲाक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचे निळे वादळ साताऱ्यात धडकेल इतक्या ताकदीने आम्ही येवू, असे आश्वासन जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी दिले.