Uncategorizedमहाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त बुधगावात स्वच्छता संदेश

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

बुधगाव (ता. मिरज) | शनिवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी बुधगाव ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रसंतांच्या कार्याचे स्मरण करून स्वच्छतेचे महत्व, समाजातील जनजागृती व अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्धच्या त्यांच्या प्रबोधनात्मक कार्यावर भाष्य करण्यात आले.

कार्यक्रमात सरपंच सौ. वैशाली विक्रम पाटील, उपसरपंच श्री. अविनाश गोरखनाथ शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. दस्तगीर मुलाणी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते. या निमित्ताने ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहिम व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दिलेल्या “स्वच्छ गाव, सुंदर गाव” या संदेशाचा प्रत्यय बुधगावमध्ये दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी आजच्या तरुण पिढीने राष्ट्रसंतांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजउभारणीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत बुधगावतर्फे करण्यात आले असून कार्यक्रमात सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही