रिपब्लिकनचा ‘राम’ पुन्हा गादीवर ; निकाळजेंच्या हाती सचिव पदाची तलवार !

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या केंद्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक २३ जुलै २०२५ रोजी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशभरातून त्यांच्यावरील विश्वास आणि लोकप्रियतेला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे.

सामाजिक समतेसाठी लढणारा, समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज उचलणारा आणि संसदेत ठामपणे बोलणारा आवाज म्हणून रामदास आठवले यांचं व्यक्तिमत्त्व गेली अनेक दशके प्रभावी राहिलं आहे. पक्षात त्यांनी दिलेलं योगदान आणि नेतृत्वाच्या बळावर आज RPI (A) हा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नव्या पिढीतील नेतृत्वाला संधी देण्याचं धोरण राबवलं असून याच बैठकीत याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं.
याच वेळी मा. विनोद निकाळजे यांची पक्षाचे केंद्रीय सचिव म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. ईशान्य भारतात पक्ष विस्तारासाठी केलेल्या अथक मेहनती, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि संघटन क्षमतेला सलाम म्हणून ही निवड झाली. नागालँड, मणिपूरसारख्या दुर्गम राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी निकाळजे यांनी केलेल्या संघर्षाला केंद्रीय समितीने सलाम ठोकला आहे.

या निवडीनंतर आयु. निकाळजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, या महान जबाबदारी आणि सन्मानाबद्दल मी माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांशी आणि आपले माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले जी यांच्या दृष्टिकोनाशी वचनबद्ध आहे.
निकाळजे सध्या राष्ट्रीय सचिव, ईशान्य भारत प्रभारी तसेच संसदीय मंडळाचे आणि सिडब्ल्यूसी कमिटीचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू असून, सामाजिक न्यायाचा वसा खऱ्या अर्थाने त्या भागात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.
या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. “एकीकडे अनुभवी नेतृत्व, दुसरीकडे नव्या जोशाचा संगम रिपब्लिकन पक्ष नव्या उंचीवर असे कार्यकर्ते म्हणत आहेत.
पक्षाच्या इतिहासात ही बैठक निर्णायक ठरली आहे. एकीकडे आठवले साहेबांच्या नेतृत्वाची पुनर्रचना, तर दुसरीकडे निकाळजे सारख्या नव्या नेतृत्वाची नियुक्ती ही फक्त बदलाची नाही, तर विस्ताराची आणि नव्या क्रांतीची नांदी आहे.