गुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

रिसोड पोलीसांची धडाकेबाज कारवाई; 72 तासांत गुन्हा उघडकीस

31 मोबाईल, इलेक्ट्रीक साहित्यांसह 7.34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
रिसोड शहरातील सिव्हील लाईन भागात 16 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात रिसोड पोलिसांनी केवळ 72 तासांत मोठे यश मिळवले. सागर मोबाईल शॉपीचे शटर आणि कुलूप कापून अज्ञात चोरट्याने Vivo कंपनीचे 31 मोबाईल फोन, स्मार्ट वॉचेस, इअरबड्ससह 7,34,476 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेनंतर वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तातडीने चौकशीस सुरुवात करून तपासासाठी विशेष पथके नेमली. अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

प्रभारी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी चार तपास पथके तयार केली. तांत्रिक साधनांचा वापर, माहिती संकलन व गुप्त तपास यांच्या आधारे डिबी पथकाने आरोपीचा शोध सुरू ठेवला. या तपासातून पोलिसांनी कोल्हापूर, सातारा आणि पुण्यापर्यंत पाठलाग करून आरोपी शाहील शाह हकीम शाह (वय 18, रा. गजानन नगर, रिसोड) याला अटक केली. त्याच्याकडून सर्व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, हवालदार प्रशांत राजगुरु, आशिष पाठक, अनिल राठोड, कॉन्स्टेबल विनोद घनवट, रवि अडागळे, परमेश्वर भोने, सुनिल तिवाले, विश्वास चव्हाण, राजेश गांगवे व सुशिल इंगळे यांनी मोलाची भूमिका बजावली. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही