जिल्हा परिषदेचे अधिकारी मर्जीप्रमाणे आवडत्या मजूर सोसायटीवर मेहरबान

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच मजूर सोसायटीवर अनेक कामे ही जिल्हा परिषदेने त्याच मजूर संस्थेचे नावे टेंडर मॅनेज करून बरकत करणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभिजीत पवार नावाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मिरज तालुक्यातील अनेक गावातील आठ – आठ कामे एकाच मजूर सोसायटीवर आहेत. ही कामे कोणाच्या आशीर्वादाने मॅनेज करण्याचे काम सुरू आहे. मजूर सोसायटीच्या बीड क्षमतेपेक्षा अधिक कामे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खटाव गावात देखील त्याच मजूर सोसायटीच्या नावावर करण्यात आली आहे. लाखों रुपयांच्या रुपयांच्या कामाचे वाटप ठराविक मजूर सोसायटीला व ठेकेदाराला केले असून सुशिक्षित बेरोजगार व इतर छोट्या ठेकेदारांसाठी व नोंदणीकृत मजूर सोसायट्यांना ही टेंडर प्रक्रिया अन्यायकारक आहे. अशा जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केली आहे.

या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची आठ दिवसात चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. येणाऱ्या आठ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कारवाई न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर “बेमुदत ठिय्या आंदोलन” करण्याच्या इशारा देखील परशुराम बनसोडे यांनी दिला आहे.