लोकशाही मार्गाने उपोषण करणारे मरणाच्या दारात ; उपोषणकर्ते मंडपात, अधिकारी मात्र घरात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मालगाव ता. मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीला जाणीवपूर्वक उपस्थित न राहिल्याने तसेच ग्रामपंचायत गैरकारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईच्या निषेधार्थ मालगावचे उपसरपंच मा. तुषार खांडेकर यांचे लोकशाही मार्गने आमरण उपोषण बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 पासून मिरज पंचायत समिती, मिरज समोर सुरू केले आहे. आज मंडपातील उपोषणाचा सहावा दिवस असून उपोषणकर्ते तुषार खांडेकर यांची तब्येत खालावली तसेच त्यांना अशक्तपणा आलेला असून छातीत जळजळ होते आहे डोके जाम होत आहे. जिल्हा परिषदेने जाणीवपूर्वक घेतलेल्या झोपेच्या सोंगामुळे आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी सर्व पक्षीय, पक्ष संघटनानी व आंबेडकरी संघटनानी आक्रोश मोर्चाचे हत्यार उपसले आहे.
मालगावचे तुषार खंडेकर हे मंडपात गेल्या सहा दिवसांपासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषनासाठी बसले आहेत. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन या सणांना जोडून आलेल्या सलग सुट्टीमुळे अधिकारी व कर्मचारी घरात असल्याने मरणाच्या दारात असलेल्या उपोषण कर्त्याच्या जीवावर बेतले असताना देखील प्रशासनाला सुरेश जगताप यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता आलेली नाही. गैरकारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस हजर न राहिलेल्या अधिकाऱ्याचे निलंबन करावे या मागणीसाठी तुषार खांडेकर ठाम आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्यासाठी व तुषार भाऊ खांडेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला जाग आणून ग्रामविकास अधिकारी जगताप यांचे निलंबन तात्काळ करण्यात यावे. अन्यथा, गुरुवार दि. 22 ऑगस्ट 2024 रोजी मिरज पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून सर्व पक्षीय पक्ष संघटनेच्या वतीने व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.
तरी गुरुवारी 11 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेवर निघणाऱ्या आक्रोश मोर्चा’त सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन सर्व पक्षीय पक्ष संघटनेच्या वतीने व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने केलंय.