वड्डी गावात मरगुबाई देवीचा अद्भुत चमत्कार की प्रकोप ; शतकांनंतर देवीच्या मूर्तीचा तोंडदिशा बदलली ; गावात खळबळ आणि श्रद्धेची लाट

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | वड्डी या गावात एक अद्वितीय आणि रहस्यमय घटना घडली असून संपूर्ण परिसरात याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. वड्डी गावातील ग्रामदैवत असलेल्या प्राचीन मरगुबाई देवी मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीच्या तोंडाची दिशा अचानक बदलली. अनेक दशकांपासून पूर्वेकडे असलेले मूर्तीचे तोंड आता ईशान्य दिशेकडे वळले आहे, आणि या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
ही घटना घडली त्यावेळी नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी सकाळी पूजेसाठी मंदिरात आले होते. पूजेसाठी सज्ज होत असताना त्यांना देवीची मूर्ती पूर्वीपेक्षा वेगळ्या दिशेला वळलेली दिसली. प्रथम त्यांनी आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवला नाही, मात्र पुन्हा पाहिल्यावर त्यांना खात्री पटली की मूर्तीचे तोंड आता ईशान्य दिशेकडे आहे.
या गोष्टीची माहिती काही क्षणातच गावभर पसरली. ग्रामस्थ, भाविक आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी मंदिराकडे धाव घेतली. काहींनी हे देवीचा चमत्कार मानले, तर काहींनी भविष्यातील संकट किंवा कोणत्यातरी महत्त्वाच्या बदलाची सूचना असल्याचे सांगितले. त्यामुळे मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि सामूहिक प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले. अनेकांनी देवीची क्षमा मागत नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
मंदिराचे जीर्णोद्धार व विस्ताराचे काम सध्या सुरू असून, काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे काही भाविकांच्या मते, देवी बांधकामाच्या अपूर्णतेवर नाराज असावी. तर काहींच्या मते, हे जागृत देवतेचे संकेत असून त्यामागे कोणीतरी सूक्ष्म आध्यात्मिक अर्थ आहे.
या प्रकारावर गावातील काही ज्योतिष आणि धार्मिक जाणकारांनी तातडीने लक्ष वेधले आहे. त्यांनी मूर्तीचे निरीक्षण करून अधिक संशोधनाची गरज असल्याचे सांगितले आहे. सध्या मंदिर परिसरात भाविकांची सतत वर्दळ सुरू आहे आणि स्थानिक प्रशासनही या घटनेवर लक्ष ठेवून आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे एक चमत्कारिक, पण श्रद्धेला जागृत करणारे प्रसंग आहे. वड्डी गावात पूर्वी कधीच न झालेली अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि भक्तिभाव यांचे वातावरण पसरले आहे. देवीचा चमत्कार असो वा प्रकोप हे निश्चित आहे की वड्डी गावाने आज एक ऐतिहासिक आणि दैवी घटना अनुभवली आहे.