हॉटेल व्यवसायिकांच्या वर्चस्ववादातून अफगाण हॉटेल फोडले : दोन गटातील आठ जण जखमी : मात्र टोळी युद्धाचा संशय

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
हॉटेल व्यवसायिकांच्या वर्चस्ववादातून मिरज शहरातील अफगाण हॉटेल फोडन्यात आले आहे. हल्लेखोरांनी या हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड केली आणि काचा फोडल्या. या तोडफोडत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. काजी गटाच्या तरुणांनी हा हल्ला करून हॉटेलची तोडफोड केली असा कुपवाडे गटाचा आरोप आहे. तोडफोडी दरम्यान आठ जण जखमी झाले. जखमी मध्ये कुपवाडे गटाचे पाच आणि काजी गटाच्या तिघांचा समावेश आहे. तर कुपवाडे गटानेच आपल्यावर हल्ला केल्याचा काजी गटाचा आरोप आहे.
अफगाण हॉटेल मधील सोहेल कुपवाडे, वसीम कुपवाडे, नसीम कुपवाडे, दस्तगीर कुपवाडे, समीर कुपवाडे हे जखमी झालेत. तर दुसऱ्या गटातील मतीन काजी, बिलाल काजी आणि मोदींना काजी हे जखमी झाले आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत तपास करीत आहेत.
हॉटेल व्यवसायिक वादाच्या वर्चस्ववादातून हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे, मात्र, चार दिवसापूर्वी मिरजेत काजी आणि नदाफ गटात जोरदार मारामारी झाली होती. त्यानंतर त्याच भांडणाच्या कारणावरून अफगान हॉटेल फोडन्यात आल्याचं संशय आहे.