विमल वाघमारे यांना “आदर्श माता” पुरस्कार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
जिव्हाळ्याची आई सरुबाई रामचंद्र कोलप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विमल सदाशिव वाघमारे याना “आदर्श माता पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. सरुबाई रामचंद्र कोलप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त खरे मंगल कार्यालय,सांगली येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कल्याणी शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगली) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

‘जीवन म्हणजे एक आव्हानच, असे असून देखील त्यास प्रत्येकाला सामोरे जावे लागते. पण काही जण खडतर परिस्थितीच्या वादळातही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर समाजात आपले नावलौकिक करतात. ता. मु.पो. कवठेमहांकाळ येथील मातोश्री विमल सदाशिव वाघमारे या रमाई चा प्रवास असाच खडतर आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सात मुलांना सांभाळून उच्च शिक्षण देऊन सर्वसामान्य महिलांसमोर आपला आदर्श ठेवला आहे.
त्यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमलबाई यांचे माहेर हिंगणगाव ता. कवठेमहांकाळ, सांगली त्यांचे लग्न सदाशिव वाघमारे (ता.मु.पो.कवठेमहांकाळ) यांच्याशी झाले. प्रतिकूल स्थितीमुळे विमल वाघमारे यांना घरकामासह मुलांसोबत शेतमजुरीची कामे करावी लागत. काही वर्षानी त्यांच्या पतींचे निधन झाले. विमलबाईंवर घराची संपूर्ण जबाबदारी आली.
पदरातली २ मुले व ५ मुलींच्या संगोपनासह त्यांना उच्च शिक्षण दिले. आबासाहेब व नानासाहेब या मुलांना उच्च शिक्षण दिले. आबासाहेबांना सरकारी तर नानासाहेबांना राजकारणाचे धडे देऊन वेगळा ठसा निर्माण केला. आबासाहेब हे बृहन्मुंबई महानगर पालिकेत उच्च पदावर आहेत. सर्व संकटे खंबीरपणे सोसून त्यानी पाचही मुलींचा विवाह करून दिला. विमलबाई यांची प्रतिकूल परिस्थितीतील जिद्द पाहून त्यांना सांगली येथील खरे मंगल कार्यलयात सरुबाई रामचंद्र कोलप यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त “आदर्श माता” पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आण्णासाहेब शिंदे (व्याख्याते, सांगली), कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुधीर कोलप (अध्यक्ष, श्रावस्ती बुद्धविहार, सांगली), नानासाहेब वाघमारे (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रिपाई, आठवले गट) व सहपरिवार, स्नेहलताई सावंत, डॉ. नितीन गोंधळे, प्रकाश ओव्हाळे, तुषार लोंढे (जिल्हाध्यक्ष, वकील संघटना), महेंद्र गाडे तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.