महाराष्ट्र

डोंगरकिन्ही ते डव्हा पारंपरिक पालखी सोहळा संपन्न ; भक्तिरसात न्हाऊन निघाला परिसर

मालेगाव प्रतिनिधी | सागर शिंदे

देवउठणी एकादशीच्या निमित्ताने डोंगरकिन्ही ते डव्हा दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. परिसरातील असंख्य भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “पांडुरंग विठ्ठल” जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

सकाळी डोंगरकिन्ही येथून शंखनाद, टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले. मार्गात भाविकांनी फुलांच्या वर्षावाने पालखीचे स्वागत केले, तर भक्तिगीतांच्या स्वरांनी वातावरण अधिकच पवित्र बनले.

मालेगाव शहरात आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे अरुण बळी मित्रमंडळाच्या वतीने ओंकारगीरबाबा देवस्थान येथे फराळ व फळांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले व एकात्मतेचा संदेश दिला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही