शासन बदललं की स्कीम बदलणार, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायच ; पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने लाडक्या बहिणींचा देवा भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला. यावेळी लाडक्या बहिणींनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, युवा नेते सुशांत दादा खाडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमनताई खाडे, मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश चिवटे, आमदार सुधीर दादा गाडगीळ, निशिकांत दादा पाटील, स्वातीताई शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले लाडका देवा भाऊ यांना पुढच्या वर्षी मुख्यमंत्री करावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली, शासन बदललं की स्कीम बदलते शासन बदलू द्यायचे नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असे लाडक्या बहिणींना पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले आहे