शिंदेवाडीच्या महिलेकडून तहसीलदारांना आत्महत्येचे निवेदन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
शिंदेवाडी येथील निर्मला सुरेश कदम या महिलेनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे आत्महत्या करण्याचा परवानगी मागितली आहे. तहसीलदार यांना भेटून आज निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये पती मयत होऊन आठ वर्षे झाले तरी तीन मुलासह शिंदेवाडी ते राहण्यास आहेत शेतमजुरी करून मुलांचा संभाळ करत आहेत तरी घरातील दिर सासू ननंद वारंवार त्रास देत आहेत. येण्या जाण्यासाठी रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वारंवार पिण्याचे पाण्याचे मागणी करून देखील पाणी देत नाहीत.
वारंवार या संदर्भात पोलीस स्टेशन कडे तक्रार देऊन देखील आमची दखल घेण्यात आलेले नाही त्यामुळे आम्हास नाही न भेटल्यास मुला-मुळासह आत्महत्या चा परवानगी तहसीलदार यांच्याकडे मागितला आहे कृपया या अर्जाचे दखल घेऊन शासनाने आम्हास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.