शिर्डी येथील पुजारी प्रशिक्षण शिबिरासाठी साईश्रद्धा संस्थांनला निमंत्रण ; राजू डांगे पुजारी प्रशिक्षणासाठी रवाना

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
श्री. साईबाबा संस्थान शिर्डीशी संलग्नित असलेल्या देशभरातील तसेच इतर देशातील साई मंदिरातील पुजाऱ्यंना प्रशिक्षण देण्यासाठी शिर्डी येथे सहा दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेलुबाजार येथील साईश्रद्धा संस्थांनच्या पुजाऱ्यालाही आमंत्रित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत असलेले राजू डांगे हे शिर्डी येथे होणाऱ्या पुजारी प्रशिक्षण शिबिरासाठी रविवारी रवाना झाले आहे.
श्री. साईबाबांचा आध्यात्मिक प्रकाश भक्तांच्या हृदयात रुजला आणि हळूहळू श्री. साईभक्तांच्या संख्येत वाढत होत गेली. त्याचाच परिणाम म्हणून देश-विदेशातही श्री. साईबाबांच्या मंदिरांच्या संख्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आज प्रत्येक कोपरा हा श्री. साईबाबांनी व्यापला आहे. या सर्व मंदिरांमध्ये व साईभक्तांमध्ये राबविलेल्या पद्धती आणि प्रणाली यामध्ये एकसुत्रीपणाचे अनुसरण असणे आवश्यक आहे. याकरिता देशभरात पसरलेल्या मंदिरांच्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची साईभक्तांची मागणी लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे वतीने या पुजाऱ्याऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दि.१४ ते १९ जूलै या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर शिर्डी येथे संपन्न होणार आहे. शिबिरासाठी देशभरातील सलगदित साई मंदिरातील पुजाऱ्यासह जगभरातील साई मंदिरतील पुजाऱी या शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात प्रशिक्षक व पुजाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात देशभरातील साई मंदिर शिबिरासाठी निमंत्रण पत्र शेलुबाजार येथील साई श्रद्धा संस्थांचे अध्यक्ष मोहन राऊत यांना प्राप्त झाले असून त्यांच्यामार्फत साई श्रद्धा संस्थांनचे पुजारी राजू डांगे यांना प्रशिक्षणासाठी शिर्डी येथे पाठविण्यात आले आहे. रविवारी डांगे हे शिर्डीकरिता रवाना झाले आहे.