
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
शिवसेना नेत्या, खासदार व आमदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते मंगरूळपीर तालुक्यातील शिवसेना ओबीसी सेल तालुकाप्रमुखपदी दिनेश विठ्ठलराव जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विजयराव बोरकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण गावागावांत पोहोचविणे तसेच समाजातील ओबीसी घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे कार्य करावे, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.
या प्रसंगी आमदार भावनाताई गवळी यांनी पक्षसंघटन मजबूत करण्याचे मार्गदर्शन केले. तर जिल्हाध्यक्ष विजयराव बोरकर यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आणि ओबीसी समाजाशी अधिक जवळीक साधण्याचे आवाहन केले.
नियुक्ती सोहळ्याला जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, युवासेना, शिक्षक सेना, महिला आघाडी तसेच ओबीसी सेलचे विविध तालुकाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्तीमुळे मंगरूळपीर तालुक्यात शिवसेना ओबीसी सेलचे संघटन अधिक भक्कम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.