प्रेम विवाह रागातून कुटुंबावर हल्ला ; नवरा-नवरीसह पाचजण जखमी ; मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मालगाव (ता. मिरज) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला केला आहे., नवरा – नवरी यांच्यासह पाच जणांना जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे. जखमींना मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले आहे.
वृत्तानुसार, मिरज तालुक्यातील मालगाव कबाडगे स्टोरेज जवळ राधाकृष्ण मेथे मळा येथे राहत्या घरी प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलांच्या नातेवाईकांना जबर हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची जबर घटना घडली आहे. या मारहाणीत शिवाजी खरात, सानिका खरात, राजआक्का बरखडे, शालाबाई वाघे, सुनीता कोळेकर जखमी झालेली आहेत. मारहाण करणारा मुलीचा सख्खा मामा असून त्याच्या मुली समान भाची सोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या मामासह, मुलीची आई-वडील आणि त्यांच्या नातेवाईकांनी घरात शिरून काठी आणि रॉडने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर ही मारहाण अमोल कोळेकर, अनिल कोळेकर, सागर गडदे, साहिल गडदे, संगीता गडदे, मोहिनी कोळेकर, रत्नाबाई कोळेकर यांनी केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.