महाराष्ट्रराजकारणसामाजिक

श्र्वेतपद्म कांबळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ; आमदार इद्रिस नायकवडी

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

संपादक | जयंत मगरे
मिरज |
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू व कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारण हे निवडणुकी पुरतेच ठेवावे, व्यक्तिगत संबंध मात्र, हे चांगलेच असावेत असे मत आमदार इद्रिस नायकवडी :यांनी व्यक्त केले. श्र्वेतपद्म कांबळे यांनी समाजकारणाचा चांगला पॅटर्न सुरू केला आहे, या पॅटर्नची व्याप्ती वाढावी. राजकीय जीवनाच्या सुरुवातीला समाजकारणाला महत्व देणाऱ्या श्वेतपद्मचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरव उदगार आमदार इद्रिस नायकवडी यांनी काढले. माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंती निमित्त मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, याप्रसंगी आमदार इद्रिस नायकवडी हे बोलत होते.

यावेळी आरपीआयचे राज्यसचिव जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष छाया सर्वदे, श्रीमती रेखा विवेकराव कांबळे, माजी सभापती महादेव कुरणे, अँड. वासुदेव ठाणेदार, सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफिकभाई खतीब, भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे, आर पी आयचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव, आय टी शेलचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते.

आ. नायकवडी म्हणाले, समाजकारण आणि राजकारण याची गलत करून चालत नाही, भावनिक होऊन राजकारण करता येत नाही. राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने समाजकारणाला जास्तीत जास्त महत्व देणे गरजेचे आहे. राजकारणात कोणतीही शास्वती राहिलेली नाही. आज कट्टर विरोधक हे पण कधीही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे राजकारण निवडणुकी पुरते ठेवावे, व्यक्तिगत संबंध हे मात्र चांगलेच असावेत, असे ही आमदार इद्रिस नायकवडी यांनी यावेळी सांगितलं.

कवठेमहांकाळ येथील जेष्ठ समाजसेविका ‘पँथर’ विमल सदाशिव वाघमारे, समाजसेविका जयश्रीताई पाटील, समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार, समाजसेविका अनिता अनिल हारगे, प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक चव्हाण यांच्या सहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 जणांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन जणांना रिपाईचे नियुक्तीपत्र देण्यात आले शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल तलरेजा, मिरज शहर युवा आघाडी कार्याध्यक्ष सोहेल कांडेकरी आणि मिरज शहर संघटक नागेश राठोड या तिघांची नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही