सणबुरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
पाटण | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दरवर्षी 14 एप्रिल रोजी जयंती सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे निलज्योत मित्र मंडळ, सणबुर (भीमनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, क्रांतिसूर्य, ज्ञानसूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायचे प्रणेते, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती महामहोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित समाजबांधवानी व भगिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना म्हणण्यात आली आणि सामाजिक समतेचा व सहभागाचा संदेश देण्यात आला. या महामनवाच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
या प्रतिमेपूजनावेळी जितेंद्र मगरे (अध्यक्ष, आंभिरा ट्रान्सलॉजीस्टिक, महाराष्ट्र (रजि.), शिवाजी मगरे, बबन मगरे, संपत मगरे, भीमराव मगरे, अशोक मगरे, मोहन मगरे, महेश मगरे, जयंत मगरे, सुरेश मगरे, अशोक मगरे (दादा), अविनाश मगरे, शोभा मगरे, स्वरा मगरे, सुशीला मगरे, निर्मला मगरे, अर्चना मगरे, शामल मगरे, अक्काताई मगरे, कल्पना मगरे, वर्षा मगरे, नंदिनी मगरे, सक्षम मगरे, लक्ष्मी मगरे तसेच अनेक भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.