मिरज तालुक्यात मल्लेवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, परिसरात खळबळ

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मल्लेवाडी गावच्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गावाच्या बाजूला असलेल्या ओसाड जागेत कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे ही घटना समोर आली. परिसरात अचानक दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय टीम आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने परिसरात भीती आणि चर्चेला उधाण आले आहे. पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.