समाज मंदिराचे निर्माण व स्मशान भुमीचे सौंदरीकरण करा, रामाभाऊ कुर्हाडे यांची मागणी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मौजे पेडगाव (तांडा) ता. मंगरुळपीर येथील वडार समाज मंदिराचे निर्माण व स्मशान भुमीचे सौंदरीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी रामा बाबुराव कुन्हाडे यांनी आमदार श्याम खोडे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
मौजे पेडगाव (तांडा) ता. मंगरुळपीर जि. वाशीम येथे वडार समाजाची ३०० ते ३५० घराची वस्ती आहे. सदर गावाच्या शिवारात परिसरात वडार समाजाचे मंदीर (देवस्थान) नाही. त्यामुळे वडार समाजाला देवाला प्रार्थना करता येत नाही. तसेच सदर गावामध्ये मृतदेह जाळण्याकरीता स्मशानभूमी असून सदर स्मशानभूमीची अवस्था अत्यंत खराब स्थितीत आहे. त्यामध्ये मृतदेह जाळणे खुप कठीण झाले आहे.
तरी पेडगाव (तांडा) या गावामध्ये वडार समाज मंदीराचे निर्माण करणेकरिता व स्मशानभुमीचे सौंदरीकरण करणेकरीता निधी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामा कुर्हाडे यांनी लेखी निवेदनाव्दारे वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांचेकडे केली आहे.