समृद्धी महामार्गावर राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा अपघात ; अपघातात 1 ठार तर 15 जखमी

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
समृद्धी महामार्गावर सकाळी ५ वाजताच्या सुमारास पुणे वरून नागपुरकडे जात असलेल्या MH. 12 HG. 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्ग चॅनेल नं 215 वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे 5 किमीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याचा माहिती आहे. या अपघातात एक ठार झाला असून, सहा गंभीर जखमी आणि 10 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.
या अपघातातील सहा रुग्ण उपचारासाठी शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील दोन रुग्ण अकोला येथे रेफर केले तर दोन रुग्ण अमरावती येथे खाजगी रुग्णालयात गेलेत. तसेच गंभीर जखमींना कारंजा आणि अकोला रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे, मंगरूळपीरच्या तहसीलदार शितल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे, यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताबाबत माहिती घेतली.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत शेलुबाजार येथील पांडुरंग कोठाळे, राठी, गोपाल राऊत, राहुल गुप्ता, साई मंदिर येथे सकाळी व्यायाम करणारे नागरिक यांच्यासह वनोजा येथिल नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मदत केली.