गुन्हे विश्व्विदर्भ

सहा तासात चोरीचा गुन्हा उघड ; रिसोड पोलिसांचा विजेसारखा तपास ; दुचाकीसकट आरोपी जेरबंद

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

रिसोड शहरात महाराष्ट्र बँकेसमोरून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडताच रिसोड पोलिसांनी अक्षरशः झपाट्याने कारवाई करत अवघ्या सहा तासांतच आरोपीला गजाआड करत चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. पोलिसांच्या या तात्काळ आणि काटेकोर तपासामुळे नागरिकांनी समाधानाचा श्वास घेतला आहे.

४ ऑक्टोबर रोजी शेगाव खोडके (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील संदेश गजानन नरवाडे हे आपल्या एमएच २० एक्स ११२७ स्प्लेंडर मोटरसायकलसह काही कामानिमित्त रिसोडला आले होते. मात्र बँकेसमोर उभी केलेली दुचाकी क्षणात गायब त्यांनी सर्वत्र शोधाशोध करून थेट रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक माहितीदारांचे जाळे वापरत हाती घेतली चौकशी आणि अवघ्या सहा तासांतच गुन्हेगाराचा पर्दाफाश केला आहे.

अशोक दिलीप कांबळे (वय ४२, रा. जिजाऊ नगर, रिसोड) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २० हजारांची मोटरसायकल जप्त केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले आहे.

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपरा. पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक सचिन गोखले, पो. हवालदार रमेश गोडघासे, प्रशांत राजगुरू, परमेश्वर भोणे, विनोद घनवट, रवी आढागळे, सुनील तिवाले, ठाकरे यांनी केली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही