महाराष्ट्रसामाजिक

गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश ; सिटी सर्व्हे ऑफिस बुधगावमध्येच कायम

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

बुधगाव येथील सिटी सर्व्हे ऑफिस इतरत्र हलवण्याचा प्रश्न उपस्थित होताच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच-उपसरपंच आणि नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. ऑफिस हलवले जाणार नाही, गावातून बाहेर जाणार नाही, असा इशारा देत आज ग्रामपंचायत व नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले.

तीन स्पष्ट मागण्या

👉🏻 वाढीव लोकसंख्येनुसार बुधगावचा वाढीव सिटी सर्व्हे व्हावा.
👉🏻 सिटी सर्व्हे ऑफिस अन्यत्र हलवू नये.
👉🏻 दर आठवड्यात बुधवार व गुरुवार हे दोन दिवस अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहावेत.

प्रशासनाची कबुली

सिटी सर्व्हे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी आले. त्यांनी कबुली दिली की, ऑफिस हलवण्याचा प्रश्नच नाही, पण इमारत जुनी असून पावसात गळतीमुळे कागदपत्रांचे नुकसान होते. ग्रामपंचायतीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

ग्रामपंचायतीचे आश्वासन

ग्रामपंचायतीकडून नवी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सांगली येथील सिटी सर्व्हे ऑफिस अधिकारी ज्योती पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, वाढीव सिटी सर्व्हेसाठी ग्रामपंचायतीने ठराव करून तो कलेक्टर कार्यालयाकडे पाठवावा.

आंदोलनाला स्थगिती

ग्रामपंचायतीच्या आश्वासनामुळे आणि अधिकाऱ्यांच्या हमीमुळे बुधगावकरांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, सदर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक उग्र केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही