सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के, 3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
शिराळा | सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसर भागात बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले. त्यादृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. धरण 82 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.