कालकथीत लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ मोफत 100 किलो जिलेबी वाटप

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून आर.पी.आय (आठवले ) गटाच्या वतीने कालकथीत लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ केले वाटप करण्यात आले आहे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष पूर्ण झाल्याने आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मरणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाजवळ मोफत जिलेबीचे वाटप करण्यात आले. माजी महापौर लोकनेते कालकथीत विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 100 किलो जिलेबीचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीमती रेखा विवेकरावजी कांबळे आणि युवा नेते श्वेतपदम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांच्या नेतृत्वात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या दिनानिमित्त शंभर किलो जिलेबीचे मोफत वाटप करण्यात आले.
मिरज शहरात पहिल्यांदा मोफत वाटप करण्याचा उपक्रम आरपीआय आठवले गट आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन मोफत जिलेबी वाटपाचा आनंद घेतला.तर आर.पी.आय चे नेते पोपटराव कांबळे यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतोष जाधव, विक्रांत वाघमारे, सचिन सकटे, योगेद्र कांबळे, अविनाश कांबळे, योगेश कांबळे, अभिनव कांबळे, संतोष कांबळे, अजय वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.